यशस्वी शस्त्रक्रियेनंतर Rishabh Pant ने मानले आपला जीव वाचवणाऱ्या दोन वीरांचे आभार; व्यक्त केली कृतज्ञता (See Tweet)

ट्विटमध्ये ऋषभ पंतने रजत कुमार आणि निशू कुमार या दोघांचेही आभार मानले. याच दोघांनी अपघातानंतर ऋषभला रुग्णालयात नेले होते.

रजत कुमार आणि निशू कुमार

रस्ता अपघातानंतर भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आता आपली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती त्याने सोशल मीडियावर दिली आहे. अपघातानंतर आज पहिल्यांदा ऋषभ पंतने सोशल मिडियावर पोस्ट केली. पंत याने रस्ता अपघातानंतर मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. यासह अपघातानंतर ज्या दोन तरुणांनी त्याला मदत केली होती त्यांच्यासाठी एक खास पोस्ट ऋषभने लिहिली आहे. पंतने या तरुणांचा फोटो शेअर करत कृतज्ञता व्यक्त केली आहे.

एका ट्विटमध्ये ऋषभ पंतने रजत कुमार आणि निशू कुमार या दोघांचेही आभार मानले. याच दोघांनी अपघातानंतर ऋषभला रुग्णालयात नेले होते. पंतने लिहिले, ‘मी प्रत्येकाचे वैयक्तिकरित्या आभार मानू शकत नाही, परंतु मला या दोन वीरांचे आभार मानले पाहिजेत ज्यांनी अपघाताच्या वेळी मला मदत केली व त्यांच्यामुळेच मी सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचलो. रजत कुमार आणि निशू कुमार धन्यवाद, मी तुमचा सदैव ऋणी राहीन.’

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement