India Beat Pakistan: अभिषेक-गिलच्या वादळी फलंदाजीमुळे भारताचा विजय; सुपर-४ मध्ये पाकिस्तानचा ६ विकेट्सनी पराभव
टीम इंडियाने सुपर-४ मध्ये विजयी सलामी दिली असून, या हंगामात भारताने पाकिस्तानला दुसऱ्यांदा पराभवाची धूळ चारली आहे. या सामन्यात भारतीय संघाची कमान सूर्यकुमार यादव यांच्याकडे होती, तर पाकिस्तानचे नेतृत्व सलमान आघा यांनी केले.
IND vs PAK, Asia Cup 2025: आशिया कप २०२५ च्या सुपर-४ फेरीची सुरुवात भारताने मोठ्या विजयाने केली आहे. २१ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या रोमांचक सामन्यात भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ६ विकेट्सनी पराभव केला. या विजयासह, टीम इंडियाने सुपर-४ मध्ये विजयी सलामी दिली असून, या हंगामात भारताने पाकिस्तानला दुसऱ्यांदा पराभवाची धूळ चारली आहे. या सामन्यात भारतीय संघाची कमान सूर्यकुमार यादव यांच्याकडे होती, तर पाकिस्तानचे नेतृत्व सलमान आघा यांनी केले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)