Snake in Mitchell Johnson Room: ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनच्या हॉटेलच्या रुममध्ये निघाला साप, शेअर केला फोटो
जॉनसननं पोस्ट केलेला हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन (Mitchell Johnson) लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये इंडिया कॅपिटल्सकडून खेळत आहे. इंडिया कॅपिटल्सचा सामना बुधवारी भिलवाडा किंग्जशी होणार आहे. हा सामना भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनौ येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी जॉन्सन सध्या लखनऊमध्ये आहे आणि त्याच्या हॉटेलच्या रुममधून साप निघाला आहे, ज्याचा फोटो त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. सापाचा फोटो शेअर करताना जॉनसनं कॅप्शनमध्ये असं लिहिलंय की, "माझ्या खोलीच्या दरवाज्याजवळ साप आढळला आहे." तसेच हा कोणत्या प्रकारचा साप आहे? असाही प्रश्न त्यानं क्रिकेट चाहत्यांना विचारलाय. जॉनसननं पोस्ट केलेला हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)