Snake Enters Ground: क्रिकेट सामना सुरु असताना मैदानावर निघाला साप, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मैदानावर साप आल्याने सामना काही काळ थांबवावा लागला. मात्र, थोड्या वेळातच साप मैदानातून बाजूला गेला आणि सामना पुन्हा सुरु झाला. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

श्रीलंकेत सुरु असलेल्या लंका प्रीमियर लीग 2023 (Lanka Premier League) चा शुभारंभ 30 जुलैपासून झाला. दुसऱ्याच दिवशी (31 जुलै) लीगमधील सामना गाले ग्लेडियेटर्स आणि दांबुल जायंट्स (GT vs DA) यांच्यात खेळला जात होता. दरम्यान, मैदानावर एक हटके घटना घडली. क्रिकेट सामना सुरु असतानाच मैदानावर भलादांडगा साफ दिसला. मैदानावर साप आल्याने सामना काही काळ थांबवावा लागला. मात्र, थोड्या वेळातच साप मैदानातून बाजूला गेला आणि सामना पुन्हा सुरु झाला. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

श्रीलंकेच्या स्थानिक क्रिकेट लीग लंगा प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सामन्यादरम्यान मैदानावर सापाची एन्ट्री झाली. दुसऱ्या सामन्याचा दुसरा डाव सुरु असताना ही घटना घडली. बांग्लादेशचा क्रेकेटस्टार ऑलराऊंडर शाबिक अल हसन याने सर्वात आधी साप पाहिला. त्याने आपल्या हाताने सहकाऱ्यांना इशारा केला. तोपर्यंत सर्वांनीच साप पाहिला होता. व्हिडिओत पाहायला मिळते की, अंपायर सापाला मैदानाबाहेर घालवत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)