Zainab Abbas Video: मुलाखत घेत असताना पाकिस्तानी अँकरची खेळाडूला झाली टक्कर, मग पुढे काय झाले तुम्हीच पहा (Watch Video)

केपटाऊनमध्ये झालेल्या या सामन्यादरम्यान पाकिस्तानी अँकर आणि जागतिक क्रिकेटमधील प्रसिद्ध नाव झैनब अब्बास सीमारेषेच्या काठावर उभ्या राहून सामना कव्हर करत होती.

Photo Credit - Twitter

गुरुवारी एमआई केपटाऊन आणि सनरायझर्स इस्टर्न केप यांच्यात सामना झाला. या सामन्यादरम्यान अशी घटना घडली जी कदाचित तुम्ही आयपीएलमध्येही पाहिली नसेल. केपटाऊनमध्ये झालेल्या या सामन्यादरम्यान पाकिस्तानी अँकर आणि जागतिक क्रिकेटमधील प्रसिद्ध नाव झैनब अब्बास सीमारेषेच्या काठावर उभ्या राहून सामना कव्हर करत होती. नंतर सनरायझर्स इस्टर्न केपच्या डावाच्या 13व्या षटकात सॅम करन गोलंदाजी करत होता. त्याच्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर मार्को जॅन्सनने शानदार ड्राईव्ह मारला. चेंडू थेट सीमापार जाताना दिसला, तो थांबवण्यासाठी क्षेत्ररक्षकाने डीप मिड-विकेटवर डायव्ह टाकला. तो सीमारेषा वाचवू शकला नाही, पण दोरीच्या पलीकडे मुलाखत घेत असलेल्या स्पोर्ट्स प्रेझेंटर झैनाब अब्बासशी त्याची टक्कर नक्कीच झाली आणि ती खाली पडली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now