IND vs ENG Test Series 2024: कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का, 'हा' स्टार खेळाडू बाहेर

कसोटी मालिका सुरू होण्याआधीच इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंड संघाचा युवा फलंदाज हॅरी ब्रूक भारताच्या कसोटी दौऱ्यातून बाहेर पडला आहे. वैयक्तिक कारणांमुळे ब्रूक लवकरच मायदेशी परतणार आहे.

IND vs ENG Test Series 2024: कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का, 'हा' स्टार खेळाडू बाहेर
Harry Brook (Photo Credit - Twitter)

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका (IND vs ENG Test Series 2024) 25 जानेवारीपासून सुरू होत आहे. दोन्ही देशांदरम्यान ही पाच सामन्यांची कसोटी मालिका 25 जानेवारी ते 11 मार्च दरम्यान खेळवली जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 (WTC 2025) लक्षात घेता ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. मात्र ही मालिका सुरू होण्यापूर्वीच एका संघाला मोठा धक्का बसला आहे. या संघाचा एक स्टार खेळाडू मालिकेतून बाहेर आहे. कसोटी मालिका सुरू होण्याआधीच इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंड संघाचा युवा फलंदाज हॅरी ब्रूक भारताच्या कसोटी दौऱ्यातून बाहेर पडला आहे. वैयक्तिक कारणांमुळे ब्रूक लवकरच मायदेशी परतणार आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने माहिती दिली आहे की हॅरी ब्रूक वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडच्या पुरुष कसोटी संघाच्या भारत दौऱ्यावरून तत्काळ मायदेशी परतण्यास तयार आहे. तो भारतात परतणार नाही. (हे देखील वाचा: IND vs ENG 1st Test: आर अश्विनची हैदराबादमध्ये कामगिरी जबरदस्त, इंग्लडला राहवे लागेल सावध, पाहा धक्कादायक आकडेवारी)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 21, 2024 05:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).