RSWS: 7 चेंडूत 4 षटकार, 1 चौकार, इरफान पठाणने मिळवला विजय, फायनलमध्ये इंडिया लिजंड्स
गुरुवारी झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया लेजेंड्सचा पराभव करून इंडिया लिजेंड्सने (INDL vs AUSL) अंतिम फेरीत प्रवेश केला.
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये (Road Safety World Series) इंडिया लीजेंड्सने (India Legends) आपली अप्रतिम कामगिरी सुरू ठेवली आहे. गुरुवारी झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया लेजेंड्सचा पराभव करून इंडिया लिजेंड्सने (INDL vs AUSL) अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 171 धावा केल्या, प्रत्युत्तरात इंडिया लिजेंड्सने 5 गडी गमावून 4 चेंडू आधी लक्ष्य गाठले. इंडिया लिजेंड्सकडून नमन ओझाने सर्वाधिक नाबाद 90 धावा केल्या. त्याच्याशिवाय इरफान पठाणने 7व्या क्रमांकावर उतरून अवघ्या 12 चेंडूत 37 धावा करत संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. ऑस्ट्रेलियाकडून बेन डंकने 46, अॅलेक्स डूलनने 35 आणि शेन वॉटसनने 30 धावा केल्या मात्र ओझा आणि पठाणच्या पॉवर हिटिंगसमोर ऑस्ट्रेलियन संघ टिकू शकला नाही आणि ते स्पर्धेतून बाहेर पडले.
A terrific comeback from the @India__Legends courtesy some brave hitting from Naman Ojha and @IrfanPathan later in the order as the men in blue seal their spot in the finals!#INDLvsAUSL #RoadSafetyWorldSeries #RSWS #YehJungHaiLegendary pic.twitter.com/TRbwfw5vhQ
— Road Safety World Series (@RSWorldSeries) September 29, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 29, 2022 08:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

