भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सध्या धावा काढण्यासाठी झगडत आहे. सध्याच्या इंग्लंड दौऱ्यात त्याला फारशी कामगिरी करता आलेली नाही. कोहलीने आतापर्यंत इंग्लंड दौऱ्यावर 11, 20, 1, 11 आणि 16 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत त्याच्या फॉर्मवरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विराट कोहलीनं एका भिंतीजवळ बसून फोटो काढलाय. त्या भिंतीवर "मी पडलो तर काय? ओह, माय डार्लिंग, तू उडालास तर काय?" असा मॅसेज लिहला गेलाय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये विराटनं दुष्टीकोन असं लिहलंय. त्याच्याबाबत सुरु असलेल्या चर्चांवर विराटनं आपल्या पोस्ट द्वारे भाष्य केलं आहे. विराट कोहलीची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)