Suresh Raina Catch Video: 35 वर्षीय सुरेश रैनाने हवेत उडी मारून घेतला अप्रतिम झेल (Watch Video)
डंक 46 धावांवर खेळत होता.
सुरेश रैनाने (Suresh Raina) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली असेल, पण तरीही त्याच्याकडे चित्त्यासारखी चपळता आहे. 35 वर्षीय रैनाने 28 सप्टेंबरला असा झेल पकडला, की प्रेक्षकांच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला... 'व्वा काय कॅच'. सुरेश रैनाने ऑस्ट्रेलियाच्या तुफानी फलंदाज बेन डंकचा झेल घेतला आहे. डंक 46 धावांवर खेळत होता. तेव्हाच त्याने चौकार मारण्याचा प्रयत्न केला, पण मैदानात उभ्या असलेल्या सुरेश रैनाने चित्याच्या वेगाने चेंडू पकडला आणि अविश्वसनीय झेल घेतला.
पाहा व्हिडीओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)