Virat Kohli Century: 3 वर्षे.. 4 महिने.. 20 दिवस.. विराट कोहलीची प्रतीक्षा संपली, कसोटी क्रिकेटमधील ठोकले 28 वे शतक (Watch Video)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 75 शतके पूर्ण केली आहेत. कोहलीच्या या शतकाची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती आणि ती आज संपली.

Virat Kohli Century: 3 वर्षे.. 4 महिने.. 20 दिवस.. विराट कोहलीची प्रतीक्षा संपली, कसोटी क्रिकेटमधील ठोकले 28 वे शतक (Watch Video)
Virat Kohli (Photo Credit - Twitter)

IND vs AUS 4th Test Day 4 Live Score Update: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात अहमदाबाद येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) शानदार शतक झळकावले आहे. हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील 28 वे शतक होते आणि यासह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 75 शतके पूर्ण केली आहेत. कोहलीच्या या शतकाची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती आणि ती आज संपली. भारतीय संघाचा अनुभवी खेळाडू विराट कोहलीने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 मधील प्रत्येक सामन्यात चांगली सुरुवात केली परंतु तो धावसंख्या पुढे नेण्यात सक्षम झाला नाही. पण अहमदाबादमध्ये कोहलीने आरामात खेळला आणि हळूहळू शतकाच्या दिशेने आपला डाव पुढे नेला.

पहा व्हिडिओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 12, 2023 01:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).