Rohit Sharma Furious: 'झोपलात का तुम्ही सगळे', चेन्नई कसोटीत रोहित शर्मा भडकला; व्हिडिओ होतोय व्हायरल

रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बांगलादेशचा संघ पहिल्या डावात 149 धावांवर गडगडला. यादरम्यान रोहित त्याच्या सहकारी खेळाडूंवर रागावलेला दिसत होता.

Rohit Sharma (Photo Credit - X)

IND vs BAN 1st Test 2024: भारत आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना (IND vs BAN 1st Test) चेन्नईत खेळला जात आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 376 धावा आणि दुसऱ्या डावात 81 धावा केल्या आहेत. भारताने 308 धावांची आघाडी घेतली आहे. आता तिसऱ्या दिवसाचा सामना रंगणार आहे. दरम्यान, रोहित शर्माचा (Rohit Sharma) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बांगलादेशचा संघ पहिल्या डावात 149 धावांवर गडगडला. यादरम्यान रोहित त्याच्या सहकारी खेळाडूंवर रागावलेला दिसत होता. व्हायरल व्हिडिओमध्ये तो म्हणाला, 'झोपलात का तुम्ही सगळे'. रोहितच्या व्हिडीओवर चाहत्यांच्या रंजक प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत. याआधी रोहितचा शुभमन गिलसोबतचा एक व्हिडिओ पाहण्यात आला होता. यामध्ये तो मस्करीच्या मूडमध्ये दिसत होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now