Asia Cup 2023, IND vs NEP Live Score Updates: नेपाळचा अर्धा संघ तंबूत; अर्धशतकवीर आसिफ शेखला सिराजने केले बाद
सध्या नेपाळचा स्कोर हा 32 षटकानंतर 6 बाद 144 इतका आहे, भारताकडून रविंद्र जाडेजाने 3 तर मोहम्मद सिराजने 2 विकेट घेतल्या आहेत
भारत विरूद्ध नेपाळ या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरू आहे. हा सामना श्रीलंकेतील कँडीमध्ये सुरू आहे. नेपाळचा संघ पाकिस्तान संघाकडून पराभूत होऊन आला आहे. तर भारत - पाकिस्तान सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला होता. दोन्ही संघ हा सामना जिंकून आपलं विजयाचं खातं उघडण्याच्या प्रयत्नात असणार आहे. या सामन्यात नेपाळकडून आसिफ शेखने जबरदस्त फलंदाजीचे प्रदर्शन करत अर्धशतक ठोकले. मात्र अर्धशतक झाल्यानंतर मोहम्मद सिराजने त्याला बाद केले. सध्या नेपाळचा स्कोर हा 32 षटकानंतर 6 बाद 144 इतका आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)