Maharashtra Cricket Association: राजकारणानंतर रोहित पवार गाजवणार क्रिकेटच मैदान, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड
रोहित पवार यांसोबतच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यापाठोपाठ त्यांचा नातू म्हणजेच आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची देखील क्रिकेटच्या मैदानात एंट्री झाली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सदस्यपदाच्या निवडणुकीत रोहित पवार क्लब गटाकडून विजयी झाले होते. त्यानंतर रोहित पवार यांची अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाली आहे. रोहित पवार यांसोबतच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत (Kiran Samant) यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि क्रिकेट हा इतिहास देशातील सर्वांनाच ज्ञात आहे. अशात आता त्यांचे नातू रोहित पवार हे देखील क्रिकेटच्या मैदानात आल्याने यांची अध्यक्षपदाची कारकीर्द कशी ठरते याकडे सर्वांचे लक्ष असेल. तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे नवनियुक्त सचिव शुभेंद्र भांडारकर, सहसचिव संतोष बोबडे आणि खजिनदार संजय बजाज यांचे बिनविरोध विजय झालेला आहे.
Also, many congratulations to newly appointed Maharashtra Cricket Association Secretary Shubhendra Bhandarkar, Joint Secretary Santosh Bobde and Treasurer Sanjay Bajaj on their unopposed victory.
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) January 8, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 08, 2023 09:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

