Zomato चा डिलेव्हरी बॉय त्याच्या मुलांना घेऊन फूड ऑर्डर्स देत असल्याचा व्हिडिओ वायरल; सोशल मीडीयात नेटकर्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया (Watch Video)
एक डिलेव्हरी बॉय आपल्या चिमुकल्या मुलीला कांगारू बॅग मधून तर मुलाला सोबत घेऊन फूड ऑर्डर्स देत असल्याचं या व्हिडिओ मध्ये पहायला मिळत आहे.
एका झोमॅटो डिलेव्हरी बॉयचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये चर्चेत आला आहे. इंस्टाग्राम वर फूड ब्लॉगर ने शेअर केलेला हा व्हिडिओ प्रेरणादायी पण तितकाच वेदनादायी आहे. एक डिलेव्हरी बॉय आपल्या चिमुकल्या मुलीला कांगारू बॅग मधून तर मुलाला सोबत घेऊन फूड ऑर्डर्स देत असल्याचं या व्हिडिओ मध्ये पहायला मिळत आहे. दरम्यान Zomato च्या अधिकृत अकाऊंट वरून देखील कमेंट करुन संबंधित झोमॅटो डिलेव्हरी बॉयचे तपशील मागावण्यात आले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)