Viral Video: नवरदेवाला हळद लावताना हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू; पहा धक्कादायक व्हिडिओ
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हैदराबादच्या काला पत्थर भागात लग्नसोहळा सुरू होता. यादरम्यान अचानक एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला.
Viral Video: तुम्ही सोशल मीडियावर लग्नसोहळ्याचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. काही व्हिडिओ तुम्हाला हसवतात तर काही तुम्हाला आश्चर्यचकित करतात. अनेकवेळा आनंदाच्या भरात अशा काही घटना घडतात ज्यामुळे लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो. असाच काहीसा प्रकार हैदराबादमध्ये एका लग्न समारंभात घडला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हैदराबादच्या काला पत्थर भागात लग्नसोहळा सुरू होता. यादरम्यान अचानक एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. वराला हळद लावत असताना एका व्यक्तीचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला.
या सोहळ्यात उपस्थित काही व्यक्तींनी हा हृदयद्रावक प्रसंग आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. आता या धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्विटरवर @MaxMalone1111 नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)