Yoga In Nauvari Saree: गेटवे ऑफ इंडिया वर महिलांचा नऊवारी साडी मध्ये योगाभ्यास; भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचाही सहभाग (Watch Video)

2015 सालापासून 21 जून हा जागतिक योग दिवस म्हणून साजरा करण्याला सुरूवात झाली आहे. यंदाचं हे 9वं वर्ष आहे.

Yoga Day 2023| Twitter

21  जून हा दिवस जागतिक योगा दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा 'वसुधैव कुटुम्बकम' थीमवर जगभरात त्याचं सेलिब्रेशन सुरू असताना मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये महिलांनी चक्क महाराष्ट्राची शान असलेल्या नऊवारी साडीमध्ये योगाभ्यास केला आहे. सकाळी 9 वाजता 9 मिनिटांसाठी योगाभ्यास करताना महिलांनी अनेक आसनं नऊवारी साडी परिधान करून केल्याचं पहायला मिळालं. या खास उपक्रमामध्ये आबालवृद्धांचा समावेश होता. Yoga Day 2023: 9व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा 'वसुधैव कुटुम्बकम' थीमवर देशभर उत्साह; CM Eknath Shinde ते राज्यपाल रमेश बैस यांनीही केला योगाभ्यास.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now