Viral Video: पती-पत्नीच्या भांडणाचे व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतीलच. पण सोशल मीडियावर एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पती घरी काम करून परत येताच पत्नीने त्याच्यावर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पती कामावरून घरी परतताच पत्नीने त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. क्रेझी क्लिप नावाच्या ट्विटर अकाऊंटने शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 5.1 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

हा व्हिडिओ पाहून अनेक युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. अखेर पत्नीने आपल्या पतीला मारहाण का केली असेल, असा प्रश्न व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांनाचं पडला असेल. विवाहबाह्य संबंधांबाबत अनेकांनी चर्चा केली असली, तरी पत्नीने नवऱ्याला फसवणूक करताना पकडले असावे, असे अनेकांचे म्हणणे आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, पती 14 तासांच्या शिफ्टनंतर परतला आहे. सकाळी ऑफिसला जाताना तो घरातील कचरा उचलायला विसरला होता, त्यामुळे संतापलेल्या पत्नीने पतीला बेदम मारहाण केली. (हेही वाचा -Girl Drinking Liquor: तरुणीने एका घोटात गिळली ग्लासभर दारू, नंतर अशी दिली प्रतिक्रिया, Watch Video)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)