Watch: भर मांडवात वधू आणि वराची जोरदार भांडण; स्टेजवरच झाली तुफान हाणामारी (Viral Video)
वर वधूला जबरदस्तीने मिठाई खायला देत आहे व तीच गोष्ट वधूला आवडली नाही. थोडी मिठाई खाल्ल्यानंतर वराचा हात सोडवून ती त्याला जोरात मारते.
सध्या लग्नसराईचा सिझन सुरू आहे आणि या सिझनमध्ये सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर अशा सर्व सोशल मीडियावर लग्नाशी निगडीत वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात. यातील काही खूप मजेदार असतात, तर काही भावनिकही असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून युजर्स हसून हसून लोटपोट होत आहेत. या व्हिडिओमध्ये वधू-वर स्टेजवरच एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. वधूने वधूला जबरदस्तीने मिठाई खाऊ घातल्यानंतर त्यांचे भांडण सुरू होते. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, वर वधूला जबरदस्तीने मिठाई खायला देत आहे व तीच गोष्ट वधूला आवडली नाही. थोडी मिठाई खाल्ल्यानंतर वराचा हात सोडवून ती त्याला जोरात मारते. मग काय, वधूकडून थप्पड खाल्ल्यानंतर वरालाही राग येतो आणि तोही वधूला मारू लागतो.अशाप्रकारे हे भांडण सुरु होऊन स्टेजवरच मोठी मारामारी होते.