Viral Video: बसमधून उतरणार्‍या चिमुकलीकडे ड्रायव्हरचं दुर्लक्ष; दप्तर दरवाज्यात अडकून फरफटत गेली काही अंतर

चिमुकलीला फरफटत नेल्याच्या प्रकरणी ड्रायव्हर वर कडक कारवाई करण्यात आली आहे.

ड्रायव्हरचं दुर्लक्ष एका चिमुकलीसाठी महाग पडलं. सोशल मीडीयात वायरल व्हिडीओ मध्ये तिचं दप्तर दरवाज्यात अडकलेलं दिसलं. बसचा दरवाजा अ‍ॅटोमेटेड होता. त्यामुळे दप्तराचा भाग त्यामध्ये अडकून दरवाजा बंद झाला. नंतर काही अंतर ती फरफटत गेल्याचं पहायला मिळत आहे. यामध्ये तिला जखमा झाल्या आहेत. सुदैवाने हा प्रकार तिच्या जीवावर बेतला नाही. याप्रकरणी ड्रायव्हर वर कारवाई झाली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)