Viral Video: गर्लफ्रेंडसोबत चाउमीन खात होता मुलगा; आईने भर रस्त्यात चपलेने केली मारहाण, व्हिडीओ व्हायरल (Watch)

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही पक्षांना वेगळे केले आणि त्यांना समुपदेशनासाठी पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांच्या माहितीनुसार, कोणतीही औपचारिक तक्रार दाखल करण्यात आलेली नाही, परंतु पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Viral Video

सोशल मीडियावर कानपूरमधील एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक महिला आपल्या मुलाला आणि त्याच्या गर्लफ्रेंडला मारहाण करताना दिसत आहे. हे जोडपे चायनीज खात असताना ही घटना घडली. माहितीनुसार, हे जोडपे बाजारात एकत्र चायनीज खात होते व त्याचवेळी मुलाचे पालक तिथे आले. या दोघांना एकत्र पाहून पालकांनी मुलाला आणि मुलाच्या मैत्रिणीला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात तरुणाची आई चप्पलने त्याला मारताना आणि मैत्रिणीचे केस ओढताना दिसते. त्याच्या वडिलांनीही त्याला थप्पड मारल्याचे व्हिडिओत स्पष्टपणे दिसते. घटनेच्या वेळी काही स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप करून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही पक्षांना वेगळे केले आणि त्यांना समुपदेशनासाठी पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांच्या माहितीनुसार, कोणतीही औपचारिक तक्रार दाखल करण्यात आलेली नाही, परंतु पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.​ ही घटना कुटुंबातील संवादाच्या अभावामुळे आणि सामाजिक दबावामुळे उद्भवलेल्या तणावाचे उदाहरण आहे. (हेही वाचा: Bull Rides Scooter: बैलाने चालवली स्कूटर; घटना CCTV मध्ये कैद, Rishikesh येथील Video व्हायरल)

आईने मुलाला केली चपलेने मारहाण-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement