Viral Video: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचा 2000 रु. ची नोट घेण्यास नकार; ग्राहकाच्या गाडीत भरलेले पेट्रोल काढून घेतले (Watch)
इथे एक तरुण स्कूटी घेऊन पेट्रोल भरण्यासाठी आला होता. त्याने 400 रुपयांचे पेट्रोल भरले व 2000 रुपयांची नोट दिली. मात्र पंपावरील कर्मचाऱ्याने ही नोट घेण्यास नकार दिला.
आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद होणार असल्याची घोषणा केल्यानंतर, देशात रोख व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. अनेक लोक आपल्याकडील 2000 रुपयांच्या नोटा खर्च करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी पेट्रोल पंपावर लांबच्या लांब रांगा दिसू लागल्या आहेत. मात्र अनेक पेट्रोल पंप मालकांनी 2000 रुपयांच्या नोटा स्वीकारत नसल्याचेही सांगितले आहे. आता सोशल मिडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये दिसत आहे की, ग्राहकाकडे फक्त 2020 रुपयांची नोट असल्याने पंपावरील कर्मचारी त्याच्या गाडीतून पेट्रोल काढून घेत आहे.
हा व्हिडीओ जालौनच्या ओराई कोतवाली भागातील बी मार्टसमोरील हिंदुस्थान पेट्रोल पंपावरील आहे. इथे एक तरुण स्कूटी घेऊन पेट्रोल भरण्यासाठी आला होता. त्याने 400 रुपयांचे पेट्रोल भरले व 2000 रुपयांची नोट दिली. मात्र पंपावरील कर्मचाऱ्याने ही नोट घेण्यास नकार दिला. तरुणाकडे फक्त 2000 रुपयांचीच नोट असल्याने कर्मचाऱ्याने ग्राहकाच्या गाडीत भरलेले पेट्रोल पुन्हा काढून घेतले. या प्रकरणाचा संपूर्ण व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. (हेही वाचा: Uttar Pradesh: एटामध्ये रोडवेज बसने दुचाकीस्वाराला चिरडले; 12 किलोमीटरपर्यंत ओढत नेली बाईक)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)