Viral Video: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने गुंडांपासून 'असे' केले स्वतःचे रक्षण, चोरांनी घेतला काढता पाय

इतक्यात त्या ठिकाणी दुसरी गाडी येते व या गाडीतून काही लोक उतरतात. हे लोक चोर किंवा गुंड असल्याचे पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या लक्षात येते

Viral Video (संग्रहित संपादित प्रतिमा)

चोरांपासून स्व-रक्षण कसे करावे याबाबतचे एक उत्तम उदाहरण दर्शवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ एका पेट्रोल पंपावरील असल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पेट्रोल पंपावर कर्मचारी एका गाडीत पेट्रोल भरत आहे. इतक्यात त्या ठिकाणी दुसरी गाडी येते व या गाडीतून काही लोक उतरतात. हे लोक चोर किंवा गुंड असल्याचे पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या लक्षात येते व त्याचवेळी तो हातामधील पेट्रोलची पाईप त्यांच्यावर फवारायला सुरुवात करतो. अंगावर पेट्रोलचा फवारा होत असल्याचे पाहून चोर तिथून पळ काढतात.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement