Viral Video: पापड वाढण्यास नकार दिल्याने लग्नात तुफान हाणामारी; 3 जण जखमी तर तब्बल दीड लाखाचे नुकसान (Watch)
या मारामारीमध्ये साधारण दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
केरळमध्ये रविवारी एका लग्नसोहळ्यात दुसऱ्या वेळेस पापड न वाढल्याने मोठी मारामारी झाली. लग्नाच्या कार्यक्रमात एका व्यक्तीला पापड वाढण्यास नकार दिल्याने भांडणाला सुरुवात झाली. मुत्तोम येथील एका सभागृहात ही घटना घडल्याचे वृत्त आहे. सभागृहात झालेल्या हाणामारीत टेबल, खुर्च्या आदी वस्तूंचे नुकसान झाले आहे. या मारामारीमध्ये साधारण दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. या हाणामारीत तीन जण जखमी झाले, तर 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पहा व्हिडीओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)