VIDEO: पतीसोबत प्रियकरालाही घरात ठेवण्याचा महिलेचा आग्रह; प्रेमासाठी 3 मुलांची आई चढली विजेच्या खांबावर
पतीने याला नकार दिल्याने तिला राग आला यानंतर ती प्रियकरासाठी विजेच्या खांबावर चढली.
गोरखपूरच्या पिपराइच परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एक महिला प्रेमासाठी चक्क विजेच्या खांबावर चढली व खाली उतरण्यास नकार दिला. ही महिला विवाहित असून तीन मुलांची आई आहे. अहवालानुसार, महिलेचे एका तरुणाशी प्रेमसंबंध आहेत व तिला आपल्या प्रियकराला आपल्या घरात ठेवायचे आहे. पतीने याला नकार दिल्याने तिला राग आला यानंतर ती प्रियकरासाठी विजेच्या खांबावर चढली. महिला खांबावर चढल्यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. पोलीस आणि विद्युत पथकही घटनास्थळी पोहोचले. नंतर महिलेची समजूत काढून तिला खाली उतरवण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पिपराइचच्या सरैया बाजार कबाडी रोडवर असलेल्या एपीजे अब्दुल कलाम प्रायव्हेट आयटीआयजवळ ही घटना घडली. पिपराईच पोलीस महिलेला ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत.
(हेही वाचा: Kuwait Car Crash: समुद्रकिनाऱ्यावर भरधाव कार चालवत स्टंटबाजी; तरूण थोडक्यात बचावला)
पहा व्हिडिओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)