Video: गुरुग्राममध्ये चालत्या कारवर फटाके फोडले; व्हिडीओ व्हायरल, पोलिसांकडून 3 जणांना अटक (Watch)

चालत्या वाहनाच्या डिक्कीवर फटाके फोडणे आणि बेदरकारपणे वेगाने वाहन चालवणे या प्रकरणी पोलिसांनी सिकंदरपूर येथून तीन आरोपींना अटक केली आहे.

Viral Video

दिल्ली-एनसीआरमध्ये बंदी असतानाही दिवाळीच्या काळात अनेक भागात फटाके फोडण्यात आले. याबाबतचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ गुरुग्राममधून व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चालत्या वाहनाच्या डिक्कीवर स्कायशॉट फटाके फोडताना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर गुरुग्राम पोलिसांनी याचा तपास सुरू केला होता. सायबर हबजवळ चालत्या कारच्या बूट स्पेसवर फटाके फोडण्यात आल्याचा दावा केला गेला होता.

आता चालत्या वाहनाच्या डिक्कीवर फटाके फोडणे आणि बेदरकारपणे वेगाने वाहन चालवणे या प्रकरणी पोलिसांनी सिकंदरपूर येथून तीन आरोपींना अटक केली आहे. नकुल (26), जतीन (27) आणि कृष्णा (22) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून हुंदाई वेर्ना आणि बीएमडब्ल्यू कार आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. DLF फेज-3 पोलिस स्टेशनने अज्ञात कार चालक आणि त्याच्या इतर साथीदारांविरुद्ध भादंवि कलम 279, 336, 188 नुसार गुन्हा दाखल केला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now