Burj Khalifa वर 76व्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान च्या झेंड्याची रोषणाई खरंच झाली का? पहा भडकलेल्या पाकिस्तानी नागरिकांच्या 'वायरल व्हिडिओ' नंतर बुर्ज खलिफा ने शेअर केलेला व्हिडिओ

बुर्ज खलिफाच्या आणि Pakistan Consulate General in Dubai कडून जारी व्हिडिओ मध्ये पाकचा झेंडा आणि 76व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा संदेश दिसत आहे.

14 ऑगस्टला पाकिस्तानचा आणि 15 ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. दुबईच्या प्रसिद्ध Burj Khalifa वर महत्त्वाच्या दिवशी आकर्षक रोषणाई करण्याची पद्धत आहे. यंदा 14 ऑगस्टच्या मध्यरात्री पाकिस्तानी नागरिक त्यांच्या स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज दिसण्याच्या प्रतिक्षेत होते मात्र अनेकांचा हिरमोड झाला. त्याचा एक व्हिडिओ चांगलाच वायरल झाला आहे. मात्र बुर्ज खलिफाच्या आणि Pakistan Consulate General in Dubai कडून जारी व्हिडिओ मध्ये पाकचा झेंडा आणि 76व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा संदेश दिसत आहे. काही नेटिझन्सच्या मते, पाक झेंड्याचे फोटोज, व्हिडिओ हे जुने असल्याचा दावा करण्यात आला आहे.

बुर्ज खलिफावर झळकला का पाक झेंडा?

 

View this post on Instagram

 

A post shared by Burj Khalifa by Emaar (@burjkhalifa)

भडकलेल्या पाकिस्तानींचा वायरल व्हिडिओ

फॅक्ट चेक

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now