UP Shocker: बरेलीमध्ये महिलेला पोलिसांकडून मारहाण; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कर्मचारी निलंबित (Watch)
या प्रकरणात शक्तीचा मनमानी वापर केल्याबद्दल एका पोलिसाला निलंबित करण्यात आले.
बरेली पोलिसांकडून एका महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशातील शाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडल्याचे वृत्त आहे. पोलीस एका संशयिताच्या घरी पोहोचले, ज्याचे कथित वाहन अपघातामध्ये नाव समोर आले होते. घरात पोलिसांनी महिला व तिच्या मुलाला मारहाण केली. यामध्ये दोघेही जखमी झाले आहेत. या दरम्यान पोलिसांनी महिलेचे केस पकडून तिला रस्त्यावर ओढले. मुलाला घेऊन जाण्यास विरोध केल्याने पोलीस कर्मचारी महिलेला धक्काबुक्की करताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बरेली पोलिसांनी निवेदन जारी केले. या प्रकरणात शक्तीचा मनमानी वापर केल्याबद्दल एका पोलिसाला निलंबित करण्यात आले. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)