UP Head Constable Viral Video:शाळकरी मुलीकडे वाकड्या नजरेनं पाहणं पोलिस कर्मचार्‍याला भोवलं; निलंबनाची कारवाई (Watch Video)

उत्तर प्रदेश मध्ये हेड कॉन्स्टेबलचं निलंबन झालं आहे.

Viral Video UP Police | Twitter

उत्तर प्रदेश मध्ये हेड कॉन्स्टेबलचं निलंबन झालं आहे. त्याच्यावर शाळकरी मुलीला त्रास देण्याचा आरोप आहे. दरम्यान सोशल मीडीयात त्याचा एक व्हिडिओ देखील वायरल होत आहे. यामध्ये दुचाकीवर खाकी युनिफॉर्म मध्ये एक जण शाळकरी मुलीचा पाठलाग करताना दिसत आहे. तर दुसर्‍या एका स्त्री-पुरूषाने या घटनेला कॅमेर्‍यात कैद केले आहे. त्या महिलेने पोलिस कर्मचाऱ्याचा समाचार घेतला. त्याच्या वाहनाचा नंबर विचारला, ज्यावर त्याने उत्तर दिले की हे इलेक्ट्रिक वाहन आहे त्यामुळे नंबर नाही. व्हिडीओ बनवणाऱ्या महिलेने त्याच्यावर आरोप करताना ऐकले की तो परिसरात दररोज मुलींची छेड काढतो. Lucknow मध्ये दुचाकी वर 'रोमान्स' करणार्‍या जोडप्याचा व्हिडिओ वायरल; अश्लीलता पसरवणारा प्रकार म्हणत पोलिसांनी ठोकल्या बेड्या (Watch Video) .

पहा व्हीडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement