Viral Video: गुजरातमधील अरवली येथे ट्रॅक्टर चोरण्यासाठी आलेल्या तरुणाच्या अंगावरून गेलं ट्रॅक्टरचं चाक; त्यानंतर काय झालं? पहा

ट्रॅक्टर चोरण्यासाठी आलेल्या तरुणाच्या अंगावरून ट्रॅक्टरचं चाक गेल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video of Tractor Thief (PC - Twitter)

Viral Video: गुजरातमधील अरवली येथे अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे ट्रॅक्टर चोरण्यासाठी आलेल्या तरुणाच्या अंगावरून ट्रॅक्टरचं चाक गेल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती रात्री ट्रॅक्टर चोरण्यासाठी येतो. तो तेथे कोणी नसल्याचं पाहून ट्रॅक्टर चोरी करतो. मात्र, चावी फिरवताचं ट्रॅक्टर सुरू होतो आणि चोराचा एक पाय चाकाखाली अडकतो. त्यानंतर ट्रॅक्टर पुढे गेल्याने तो खाली पडतो व ट्रॅक्टरचं चाक त्यांच्या संपूर्ण अंगावरून जातं. एवढं होऊनदेखील चोर उठतो आणि पुन्हा ट्रॅक्टरवर नियंत्रण मिळवतो आणि ट्रॅक्टर चोरून नेतो.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement