Team India’s Victory Parade in Mumbai: मरीन ड्राईव्ह मध्ये टीम इंडियाच्या विजयी मिरवणूकीनंतर रस्त्यावर दिसला चपलांचा खच (Viral Video)

टी 20 वर्ल्ड कप विजेत्या संघाला भेटण्यासाठी मरीन ड्राईव्ह मध्ये काल चाहत्यांचा जनसागर उसळला होता.

टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मुंबई मध्ये परतलेल्या टीम इंडियाला पाहण्यासाठी चाहत्यांनी victory parade ला मोठी गर्दी केली होती. 4 जुलै ला संध्याकाळी 7.30 च्या सुमारास ही परेड सुरू झाली. ओपन डेक मधून टीम इंडियाने चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. मरीन ड्राईव्ह भागामध्ये उसळलेली गर्दी पाहून सारेच भारावले होते मात्र आता वायरल होत असलेल्या व्हिडिओ मध्ये या परेड नंतर अनेकांच्या चप्पला रस्त्यावर पडलेल्या दिसत आहेत. देहभान विसरून अनेकजण या परेड मध्ये सहभागी झाले होते. बीएमसी ने दिलेल्या माहितीनुसर आज सकाळी त्यांनी 2 डंपर्स आणि 5 जीप कचरा गोळा केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या