Shocking ! ट्रेनची जोरदार धडक बसूनही व्यक्ती बचावला, बाईकचा मात्र चुराडा, पाहा व्हिडीओ

रेल्वे अपघातांचे व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात, देव तारी त्याला कोण मारी, अशी म्हण तुम्ही ऐकली असेल.

Railway | Image used for representational purpose | (फोटो सौजन्य-फेसबुक)

रेल्वे अपघातांचे व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात, देव तारी त्याला कोण मारी, अशी म्हण तुम्ही ऐकली असेल. होय, वेगवान ट्रेनच्या धडकेतून थोडक्यात बचावलेल्या व्यक्तीसाठी ही म्हण अगदी खरी ठरली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती दुचाकीवरून रेल्वे ट्रॅक ओलांडत असतांना वेगवान ट्रेनने त्याला धडक दिली, मात्र त्याचे नशीब बलवत्तर होते,  मृत्यू अगदी जवळून स्पर्श करून गेला आणि तो बचावला  ही घटना मुंबईची असल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement