Vulgar Dance At CSMT Railway Platform: रेल्वे स्टेशनवर नाचणाऱ्या सीमा कन्नौजियाला मुंबई RPF ने शिकवला धडा; व्हिडिओ शेअर करून मागितली माफी मागितली, Watch Video
मुंबई आरपीएफने सीमा कन्नौजियावर कारवाई केली आहे. ज्यानंतर सीमा आता एका व्हिडिओमध्ये तिच्या वागणुकीबद्दल माफी मागत आहे. तसेच तिने लोकांना रेल्वे स्थानकांवर रील न करण्याचे आवाहन देखील केले आहे.
Vulgar Dance At CSMT Railway Platform: सोशल मीडिया ब्लॉगर सीमा कन्नौजिया (Seema Kanojiya) चे काही व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यातील एका व्हिडिओमध्ये ती छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या (सीएसएमटी) प्लॅटफॉर्मवर बेभानपणे नाचताना आणि प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना त्रास देताना दिसत होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. इतर काही व्हिडिओंमध्येही ती वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर अशाच पद्धतीने नाचताना दिसली. ज्यामुळे लोकांना समस्यांना सामोरे जावे लागले. आता मुंबई आरपीएफने सीमा कन्नौजियावर कारवाई केली आहे. ज्यानंतर सीमा आता एका व्हिडिओमध्ये तिच्या वागणुकीबद्दल माफी मागत आहे. तसेच लोकांना रेल्वे स्थानकांवर रील न करण्याचे आवाहन देखील करत आहे. सध्या सीमाच्या या माफीनाम्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा - Viral Dance Video: मुंबईत स्टेशनवर मुलीचा भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहून नेटीझन्सनी लावला डोक्याला हात, Watch Video)
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)