'Rate Limit Exceeded' Cake Goes Viral: ट्वीटरच्या कर्माचार्याने राजीनाम्याची घोषणा करण्यासाठी ट्वीटरच्याच नव्या अपडेट चा केला क्रिएटीव्ह वापर (View Pic)
एलन मस्कने ट्वीटर विकत घेतल्यानंतर त्यामध्ये अनेक बदल केले आहेत. 'Rate Limit Exceeded' हा नुकताच केलेला बदल आहे.
ट्वीटरने नुकतेच व्हेरिफाईड युजर्सना प्रतिदिन 6000 पोस्ट पाहता येणार असल्याची मर्यादा आखून दिली आहे. हीच मर्यादा अनव्हेरिफाईड युजर्स साठी 600 पोस्टची आहे. ती पार केली की आपोआपच "rate limit exceeded" चा मेसेज येतो. यावरून सध्या ट्वीटर वर अनेक मीम्स, जोक्स वायरल होत आहेत. पण ट्वीटर मधील एका कर्मचार्याने याचाच क्रिएटीव्हली वापर करत आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. केकवर हे ट्वीटर पेज साकारत तिने एक फोटो पोस्ट केला आहे. सोबत "When you don’t know how to say goodbye, use cake." असे कॅप्शन दिलं आहे. नक्की वाचा: Threads Social App: Meta च्या Threads अॅपला पहिल्याच दिवशी युजर्सची पसंती, मस्क यांची कायदेशीर कारवाईची धमकी .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)