Rajasthan Road Accident Video: समोर आला राजस्थानच्या सवाई माधोपूर रोड अपघाताचा भीषण व्हिडिओ; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू (Watch)

गेल्या रविवारी हे कुटुंब सीकरहून कारमधून सवाई माधोपूर येथील रणथंबोरच्या त्रिनेत्र गणेशाच्या दर्शनासाठी येत असताना, दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावरील बनास नदीच्या पुलाजवळ हा अपघात झाला.

Rajasthan Road Accident Video

Rajasthan Road Accident Video: राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील बौनली पोलीस स्टेशन परिसरात एकाच कुटुंबातील 6 जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. आता या घटनेचे अंगावर काटा आणणारे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या व्हिडिओमध्ये एक्स्प्रेस वेवर झालेला हा रस्ता अपघात स्पष्टपणे दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मिनी ट्रक चालकाचा निष्काळजीपणाही स्पष्ट दिसून येतो. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका कार सामान्य स्पीडमध्ये महामार्गावर प्रवास करत आहे. अचानक समोर उभा असलेला एक मिनी ट्रक यू-टर्न घ्याचा प्रयत्न करू लागतो. ट्रक वळलो इतक्यात मागून येणारी ही कार त्याला धडकते. या अपघातात तीन विवाहित जोडप्यांचा एकत्र मृत्यू झाला होता. अपघातानंतर मिनी ट्रक चालक ट्रकसह घटनास्थळावरून पसार झाला.

गेल्या रविवारी हे कुटुंब सीकरहून कारमधून सवाई माधोपूर येथील रणथंबोरच्या त्रिनेत्र गणेशाच्या दर्शनासाठी येत असताना, दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावरील बनास नदीच्या पुलाजवळ हा अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन निष्पाप मुले गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर पोलिसांनी लालसोट येथून मिनी ट्रक जप्त केला मात्र चालक अजूनही फरार आहे. (हेही वाचा: Viral Video: बाईकवर स्टंट करणंं पडंल महागात, व्हिडिओ व्हायरल होताच गुन्हा दाखल)

पहा व्हिडिओ- 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now