दुसर्‍याच्या पत्नीला चुकून 'I like you' मेसेज केल्यानंतर झालेल्या धुलाई मुळे ट्वीटर वर पोलिसांकडे सुरक्षा मागणार्‍याला पंजाब पोलिसांनी दिला 'हा' मजेशीर प्रतिसाद

पंजाब पोलिसांच्या या प्रतिसादाला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. लाईक्स आणि रिट्विट्स चा त्यावर पाऊस पडत आहे

भारतात प्रत्येक राज्यातील पोलिस विभाग आता ऑनलाईन देखील नागरिकांच्या मदतीला सज्ज असतो. सोशल मीडीयात ट्राफिक अपडेट्स, महत्त्वाचे अपडेट्स ट्वीटर अकाऊंटवरून देण्यासोबतच नागरिकांच्या समस्या, टीप्स देखील ऐकून घेतल्या जातात. मुंबई पोलिस, दिल्ली पोलिस ट्वीटर ट्रेंड्स फॉलो करत अनेक मिम्स, जोक्स शेअर करत जनजागृती करताना दिसले आहेत. पण या मजेशीर अंदाजात पंजाब, आसाम, राजस्थान मधील पोलिस देखील कमी नाहीत.

पोलिसी खाक्याला पूर्वी लोकं घाबरून राहत होते पण आता स्थिती बदलली आहे. नागरिकांच्या भन्नाट प्रश्नाला आता पोलिस देखील तितक्याच मोकळ्यापणाने उत्तरं देतात.

पंजाब पोलिसांनी नुकताच एका पुरूषाच्या पत्नीला दुसर्‍यानेच "I like you" मेसेज पाठवल्याने झालेल्या धुलाई वर मजेशीर प्रतिसाद दिला आहे. Sushant Dutt नावाच्या व्यक्तीने पोलिसांना ट्वीट करत दिलेल्या माहितीमध्ये, 'माझ्याकडून दुसर्‍याच्याच पत्नीला "I like you"चा मेसेज गेल्याने जबरदस्त मारहाण झाल्याचं सांगितलं. आता माझ्या सुरक्षेसाठी काहीतरी करा. पुन्हा पुन्हा माफी मागूनही मला आज परत माझी धुलाई होण्याची शक्यता आहे. असे त्याने ट्वीट करत पंजाब पोलिसांकडे मदत मागितली होती. यावर पोलिसांनी दिलेला प्रतिसाद पहा.

पहा ट्वीट

पंजाब पोलिसांनी उत्तर देताना त्यांनी तुला मारायला नको होतं. त्यांनी तुलाच आमच्याकडे द्यायला हवं होतं. मग आम्ही त्याने केलेली आणि कायद्याखालील कारवाई दोन्ही देखील योग्य रित्या केल्या असत्या.

पंजाब पोलिसांच्या या प्रतिसादाला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. लाईक्स आणि रिट्विट्स चा त्यावर पाऊस पडत आहे. पोलिसांनी नजिकच्या पोलिस स्थानकामध्ये जाऊन तक्रार नोंदवण्याचं देखील आवाहन केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement