Pune Rains: पुण्यातील रस्त्यावर चक्क पावसाच्या पाण्यावर तरंगताना आढळली व्यक्ती, व्हिडिओ व्हायरल (Watch)
थोड्याफार पावसाने पुण्यातील रस्ते जलमय झाले, अनेक ठिकाणी रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले. रस्त्यांची कामे अजूनही बाकी असल्याने, लोकांना पाण्यातून मार्ग काढावा लागला.
Pune Rains: महाराष्ट्रातील मान्सून गुरुवारी दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात वेळेवर पोहोचला. आतापर्यंत कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली येथे मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्याच्या आयएमडीच्या मेधा खोले यांनी सांगितले की, येत्या दोन-तीन दिवसांत मान्सून मुंबई आणि पुण्यात दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधी पुण्यात मान्सून-पूर्व सरी कोसळल्या. या पावसाने पुणेकरांचे जीवन विस्कळीत केले. अशात शहरातून एक मजेशीर व्हिडिओ समोर आला असून, ज्यामध्ये एक तरुण रस्त्यावर पावसाच्या पाण्यात तरंगताना दिसत आहे. हा व्हिडिओ येरवड्यातील गोल्फ क्लब चौकाजवळील असल्याचा दावा केला जात आहे. थोड्याफार पावसाने पुण्यातील रस्ते जलमय झाले, अनेक ठिकाणी रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले. रस्त्यांची कामे अजूनही बाकी असल्याने, लोकांना पाण्यातून मार्ग काढावा लागला. यात हा तरुण रस्त्यावरील पाण्यावर एक तरंगती चटई टाकून त्यावर झोपलेला आढळला. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा: Weather Update: राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसंबंधीची संपूर्ण महिती, जाणून घ्या)
पहा व्हिडिओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)