PM Modi Statue With Lab-Grown Diamonds: अमेरिकेतील भारतीय वंशाच्या ज्वेलर्सनी बनवली प्रयोगशाळेत तयार केलेल्या हिऱ्यांपासून पीएम मोदींची मूर्ती, पहा व्हिडिओ (Watch)
राजकुमार आणि असित शर्मा अशी या ज्वेलर्सची नावे असून त्यांनी ही मोदींची हिऱ्यांची छोटी मूर्ती तयार केली आहे.
PM Modi Statue With Lab-Grown Diamonds: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी न्यूयॉर्कमध्ये भारतीय वंशाच्या लोकांना त्यांनी संबोधित केले. परदेशात पीएम मोदी यांची विशेष लोकप्रियता दिसून येते. परदेशात भारतीय वंशाच्या लोकांकडून त्यांचे खास स्वागतही केले जाते. अशात अमेरिकेतील भारतीय वंशाच्या दोन ज्वेलर्सनी 3,000 हिरे आणि दगडांपासून पंतप्रधान मोदींचा पुतळा बनवला आहे. राजकुमार आणि असित शर्मा अशी या ज्वेलर्सची नावे असून त्यांनी ही मोदींची हिऱ्यांची छोटी मूर्ती तयार केली आहे. ही मूर्ती बनवण्यासाठी साधारण दिड वर्षे कालावधी लागला, ज्यासाठी साधारण 30 लोक मेहनत घेत होते. ही मूर्ती लॅब-ग्रोन हिरे म्हणजेच प्रयोगशाळेत तयार केलेल्या हिऱ्यांपासून बनवलेली आहे. महत्वाचे म्हणजे ही मूर्ती सुरतमध्ये बनवण्यात आली आहे. ही मूर्ती ते पंतप्रधानांना भेट म्हणून देणार आहेत. (हेही वाचा: भारत ‘Quad Cancer Moonshot’ अंतर्गत USD 7.5 Million ची मदत करणार; PM Narendra Modi यांची माहिती)
प्रयोगशाळेत तयार केलेल्या हिऱ्यांपासून पीएम मोदींची मूर्ती-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)