Pilibhit Viral Video: पिलीभीत जिल्हा रुग्णालयात चक्क स्कूटरवरून नर्सचा फेरफटका; व्हिडिओ व्हायरल, सोशल मीडियावर लोकांनी व्यक्त केला राग (Watch)

या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. सततच्या निष्काळजीपणामुळे पिलीभीतचे जिल्हा रुग्णालय चर्चेत आहे, आता पुन्हा इथे अशीच घटना समोर आली आहे.

Pilibhit Viral Video

Pilibhit Viral Video: यूपीच्या पिलीभीत जिल्हा रुग्णालयातील स्टाफ नर्सच्या मनमानीपणाचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ही नर्स डोळ्यावर चष्मा घालून थेट रुग्णांच्या वॉर्डात स्कूटरवर बसून फिरत असल्याचे दिसून येत आहे. नर्सच्या अशा कृत्यामुळे कॉरिडॉरमध्ये उपचारासाठी बसलेल्या रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, अशा कृतींवर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. आता या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. सततच्या निष्काळजीपणामुळे पिलीभीतचे जिल्हा रुग्णालय चर्चेत आहे, आता पुन्हा इथे अशीच घटना समोर आली आहे. (हेही वाचा: Rajasthan Road Accident Video: समोर आला राजस्थानच्या सवाई माधोपूर रोड अपघाताचा भीषण व्हिडिओ; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू)

पहा व्हिडिओ-

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement