PIB Fact Check: रिचार्ज न करता सिम कार्ड 90 दिवस वैध राहणार? TRAI ने नवी मार्गदर्शक तत्वे जारी केल्याचा दावा, जाणून घ्या सत्यता
ट्राय मोबाइल यूजर्स कन्झ्युमर हँडबुकनुसार, तुमचे सिम रिचार्ज संपल्यानंतर 90 दिवसांपर्यंत सक्रिय राहते. या नियमामुळे वापरकर्त्यांना वारंवार महागड्या रिचार्जच्या त्रासातून मुक्तता मिळाली आहे, असे अहवालात म्हटले आहे.
सोशल मीडियावर सध्या एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा केला जात आहे की, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने सिम कार्ड्सबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ट्रायच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रिचार्ज केले नसले तरीही सिम कार्ड 90 दिवसांच्या कालावधीसाठी वैध राहणार आहे. ट्राय मोबाइल यूजर्स कन्झ्युमर हँडबुकनुसार, तुमचे सिम रिचार्ज संपल्यानंतर 90 दिवसांपर्यंत सक्रिय राहते. या नियमामुळे वापरकर्त्यांना वारंवार महागड्या रिचार्जच्या त्रासातून मुक्तता मिळाली आहे, असे अहवालात म्हटले आहे. मात्र हा संदेश खोटा आहे. पीआयबीने दिलेल्या माहितीनुसार, बातमीच्या लेखात केलेला कथित दावा दिशाभूल करणारा आहे. नागरिकांनी अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नका, असा दावा केला जात आहे. (हेही वाचा: How to Retrieve Your WiFi Password: वायफाय पासवर्ड विसरला? अँड्रॉइड, आयओएस, विंडोज आणि macOS प्रणालीवर तो पुन्हा कसा मिळवाल?)
PIB Fact Check:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)