Pet Dog Travels In Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये पाळीव कुत्र्याचा प्रवास; पहा व्हिडिओ

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक पाळीव कुत्रा मुंबई लोकलमधून प्रवास करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये कुत्रा आपल्या मालकाजवळ शांतपणे बसलेला दिसत असून सहप्रवाशांकडून त्याला भरभरून प्रेम मिळवत असल्याचं दिसत आहे.

Pet Dog Travels In Mumbai Local (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Pet Dog Travels In Mumbai Local: मुंबई लोकल ट्रेन (Mumbai Local Train) ही शहराची लाईफलाईन मानली जाते. या लोकलमधून दररोज हजारो लोक प्रवास करतात. केवळ प्रवासासाठीचं नव्हे तर संवाद साधण्यासाठी, मित्र बनवण्यासाठी, एकत्र गाणे गाण्यासाठी लोकल सध्या एक व्यासपीठ बनत आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक पाळीव कुत्रा मुंबई लोकलमधून प्रवास करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये कुत्रा आपल्या मालकाजवळ शांतपणे बसलेला दिसत असून सहप्रवाशांकडून त्याला भरभरून प्रेम मिळवत असल्याचं दिसत आहे. मिन्नी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोल्डन रिट्रीव्हरने आपल्या पाळीव कुत्र्यासोबत ट्रेनमध्ये प्रवास केला. मुंबईकरांना त्यांच्या कोचमध्ये पाळीव कुत्रा दिसल्याने त्यांनी दैनंदिन जीवनातील घाई-गडबडीतून आपली चिंता बाजूला ठेवली आणि ते आनंदाने कुत्र्याला जीव लावताना दिसले.

मुंबई लोकलमध्ये पाळीव कुत्र्याचा प्रवास; पहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by "SRIJANI DAS" (@roshogollaa__)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now