Obscene Dance In Front Of Lord Ganesh’s Idol: तिरुपतीमध्ये गणपतीच्या मूर्तीसमोर महिलांनी केले अश्लील नृत्य; गुन्हा दाखल, 7 जणांना अटक (Video)

व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर अलीपिरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सात जणांना अटक केली आहे. तिरुपतीच्या सप्तगिरी नगर येथील विनायक मंडपम येथे ही घटना घडली.

Obscene Dance In Front Of Lord Ganesh’s Idol (Photo Credit : x)

Obscene Dance In Front Of Lord Ganesh’s Idol: सध्या देशभरात गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरण पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात ढोल-ताशांच्या गजरात हा सण साजरा होतो. मात्र सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका गणपती मंडळात साडी नेसलेल्या महिला गणेशमूर्तीसमोर अश्लील नृत्य करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर अलीपिरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सात जणांना अटक केली आहे. तिरुपतीच्या सप्तगिरी नगर येथील विनायक मंडपम येथे ही घटना घडली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत तरुणी आणि पुरुषांनी गणपतीच्या मूर्तीसमोर अश्लील नृत्य केल्याचे वृत्त आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ताकीद दिली आहे की, सध्या सुरू असलेल्या उत्सवादरम्यान गणपतीच्या मूर्तींसमोर कोणतेही अश्लील नृत्य सादर केले जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले. (हेही वाचा: Reel Goes Wrong: रील बनवताना तोल गेला अन् तरूणी गंगा नदीत पडली)

तिरुपतीमध्ये गणपतीच्या मूर्तीसमोर महिलांनी केले अश्लील नृत्य-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now