Germany: OMG! आता बर्लिनमधील महिला टॉपलेस होऊन जलतरण तलावात पोहू शकतात; सरकारने दिली परवानगी
डेली मेलच्या वृत्तानुसार, राज्य सरकारने गुरुवारीच घोषणा केली की बर्लिनमधील महिलांना शहरातील सार्वजनिक स्विमिंग पूलमध्ये टॉपलेस जाण्याची परवानगी दिली जाईल.
Germany: जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये महिलांना सार्वजनिक स्विमिंग पूलमध्ये (Public Swimming Pools) टॉपलेस (Topless) आंघोळ करण्याची परवानगी देण्यात आली आहे. लवकरच महिलांना शहरातील सार्वजनिक तलावांमध्ये टॉपलेस पोहण्याची परवानगी दिली जाईल. राज्य सरकारने आज जाहीर केले की बर्लिनमधील महिलांना शहरातील सार्वजनिक जलतरण तलावांमध्ये टॉपलेस जाण्याची परवानगी दिली जाईल. एका महिलेवर झालेल्या भेदभावाच्या तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. जीला राजधानीतील एका स्विमिंग पूलमध्ये टॉपलेस होण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. बर्लिन सिनेट फॉर जस्टिस, डायव्हर्सिटी अँड अँटी - भेदभाव या महिलेने समान वागणुकीसाठी सिनेटच्या लोकपाल कार्यालयाकडे संपर्क साधला आणि महिलांना पुरुषांप्रमाणे टॉपलेस पोहता यावे अशी मागणी केली. डेली मेलच्या वृत्तानुसार, राज्य सरकारने गुरुवारीच घोषणा केली की बर्लिनमधील महिलांना शहरातील सार्वजनिक स्विमिंग पूलमध्ये टॉपलेस जाण्याची परवानगी दिली जाईल.