Nitin Gadkari On Toll Exemption: 'महामार्गांवर प्रवास टोल फ्री होणारच नाही' मंत्री नितीन गडकरी यांचा जुना व्हिडिओ होतोय वायरल (Watch Video)
नितीन गडकरी यांचा टोल फ्री प्रवासाला का आहे विरोध? घ्या जाणून
टोल फ्री प्रवासासाठी अनेक राजकीय पक्ष, विरोधक आवाज उठवत आहेत. पण देशाचे लोकप्रिय नेते आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा एक जुना व्हिडिओ वायरल झाला आहे. त्यामध्ये एका पत्रकाराने आपल्याला हायवे वर मोफत प्रवास करायला मिळत नसल्याची तक्रार जाहीरपणे केली त्यावर बोलताना त्यांनी थेट ही सोय मिळणार नाही असं स्पष्टच सांगितलं. दरम्यान ज्यांना चांगले रस्ते हवे आहेत त्यांना टोलचे पैसे मोजावेच लागणार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान हा व्हिडिओ 2021 मधील एका जाहीर कार्यक्रमामधील आहे. Atal Setu मुंबईकरांसाठी खुला! पहिल्याच दिवशी केलेल्या गर्दीचे, पान खाऊन थुंकल्याचे फोटोज व्हिडिओज वायरल! (Watch Video, Pics) .
पहा व्हीडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)