Nandi Idol 'Drinking' Milk Video: उत्तर प्रदेश येथील मंदिरात नंदी दुध पीत असल्याचा दावा; 'चमत्कार' पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी (Watch)
नंदीला दूध पाजण्याची लोकांमध्ये स्पर्धा लागली होती. पिनाहाट परिसरात रविवारी सकाळी मंदिरात लोटा, वाटी आणि चमच्याने नंदीला दूध अर्पण भाविक जमले होते.
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या, विज्ञानाच्या युगात आजही देशात अनेक लोक चमत्कारांवर विश्वास ठेवतात. विविध चमत्काराबाबत अनेक अफवा रोज समोर येत असतात. आता उत्तर प्रदेशमध्ये अलीगढ येथील नंदीची मूर्ती दुध पीत असल्याची अफवा समोर आली आहे. यानंतर अफवेवर विश्वास ठेऊन लोकांनी मंदिरांमध्ये प्रचंड गर्दी केली होती. नंदीला दूध पाजण्याची लोकांमध्ये स्पर्धा लागली होती. पिनाहाट परिसरात रविवारी सकाळी मंदिरात लोटा, वाटी आणि चमच्याने नंदीला दूध अर्पण भाविक जमले होते. आजूबाजूच्या अनेक गावातील लोक या मंदिरात आले होते. सायंकाळी उशिरापर्यंत मंदिरामध्ये लोक नंदीला दूध पाजत होते.
शास्त्रानुसार मूर्ती दूध, पाणी किंवा कोणतेही द्रव पिणे हा चमत्कार नाही. हे पृष्ठभागावरील तणाव आणि केपलरियन बलामुळे होते. मूर्तीला अनेक छिद्रे असतात व त्यातून द्रव पदार्थ आत पाझरतो. बहुतेक दूध खालून बाहेर पडत असले तरी मूर्ती दूध पीत असल्याची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण होते. (हेही वाचा: Dead Rat Found In Dish Served: लुधियाना येथील प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये ग्राहकाला दिलेल्या भाजीमध्ये सापडला मृत उंदीर; Watch Video)
Nandi Idol 'Drinking' Milk Video-
अलीगढ़ - शिव परिवार में नंदी बाबा की मूर्ति पी रही दूध, मंदिर में जुटी दूध पिलाने के लिए लोगों की भीड़, लोधा थाना क्षेत्र के मूसेपुर स्थित मंदिर का मामला.#Aligarh pic.twitter.com/jHPdzuTz90
— भारत समाचार | Bharat Samachar (@bstvlive) July 3, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 03, 2023 11:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

