Mere Ghar Ram Aaye Hain Song By Muslim Singer: मुस्लिम गायक इलियाजने राममंदिर उद्घाटनासाठी गायलं 'मेरे घर राम आये हैं' गाणं, पहा व्हिडिओ

इलियाज असं या गायकाचं नाव असून त्याने राममंदिर उद्घाटनासाठी 'मेरे घर राम आये हैं' हे गाणं गायलं आहे. इलियाजचा हा आवाज ऐकूण नेटीझन्स मंत्रमुग्ध झाले आहेत.

Muslim Singer Iliyaz (PC - X/@manishindiatv)

Mere Ghar Ram Aaye Hain Song By Muslim Singer: येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राम लल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार आहे. प्रभू रामाच्या दर्शनासाठी देशातील सर्व भक्तांना उत्सुकता लागली आहे. सध्या सोशल मीडियावर लेह येथील एका मुस्लिम गायकाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. इलियाज असं या गायकाचं नाव असून त्याने राममंदिर उद्घाटनासाठी 'मेरे घर राम आये हैं' हे गाणं गायलं आहे. इलियाजचा हा आवाज ऐकूण नेटीझन्स मंत्रमुग्ध झाले आहेत. ट्विटरवर @manishindiatv नावाच्या यूजर्सने इलियाजचा हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात इलियाज गिटार वाजवत 'मेरे घर राम आये हैं' गाणं गाताना दिसत आहे. (हेही वाचा - Ayodhya's New International Airport: अयोध्येतील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले जाणार महर्षी वाल्मिकी यांचे नाव; पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन)

पहा व्हिडिओ - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now