MP Shocker: इंदूरमध्ये चार मुलींकडून एका मुलीला बेदम मारहाण; बेल्टने फटकारले, केस ओढले (Watch Video)

दारूच्या नशेत युवती एकमेकींना मारहाण करीत आहेत. रात्रीच्या वेळी मुलींची अशी मारामारी सुरु असताना आजूबाजूच्या अनेक लोकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली.

MP Shocker

मध्य प्रदेशातील इंदूर शहरातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही मुली रस्त्याच्या मधोमध एका मुलीला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ इंदूरच्या एमआयजी पोलीस स्टेशन परिसरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये 4 मुली एका तरुणीला मारहाण करताना दिसत आहेत. दारूच्या नशेत युवती एकमेकींना मारहाण करीत आहेत. रात्रीच्या वेळी मुलींची अशी मारामारी सुरु असताना आजूबाजूच्या अनेक लोकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. त्यातल्याच कोणीतरी हा व्हिडीओ बनवून तो सोशल मिडियावर अपलोड केला व आता तो व्हायरल होत आहे. याप्रकरणी पीडितेने एमआयजी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलीस आता मारहाण करणाऱ्या मुलींचा शोध घेत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement