Monkey Tries to Expose Model's Breasts: माकडाचा माजी मिस पेरू Paula Manzanal चे स्तन उघड करण्याचा प्रयत्न; मारली थप्पडही (Watch Video)
मॉडेलचे स्तन उघड करण्याचा माकडाचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे पॉलाचे प्रायव्हेट पार्टस एक्सपोझ होण्यापासून वाचले.
बाली हे जगातील सर्वात सुंदर स्थानांपैकी एक आहे. जगभरातून लाखो लोक दरवर्षी बालीला भेट देत असतात. परंतु इथल्या वानरसेनेचा त्रास सहन केल्याशिवाय बालीची यात्रा करणे कठीण आहे. या आधी अनेक पर्यटकांनी इथल्या माकडांच्या उच्छादाबाबत तक्रार केली होती. आता इथे पेरुव्हियन मॉडेलसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. 28 वर्षीय माजी मिस पेरू पॉला मंझानल हिचा स्ट्रॅपलेस टॉप खाली खेचण्याचा प्रयत्न करणाऱ्या माकडाचे फुटेज अलीकडेच व्हायरल झाले आहे. इंडोनेशियन बेटाच्या उबुद मंकी फॉरेस्टमध्ये एका माकडासोबत पोज देताना, एका माकड मकाक मंझानलचे कपडे खाली खेचण्याचा प्रयत्न करत असलेले या व्हिडीओमध्ये दिसत आहे. परंतु मॉडेलचे स्तन उघड करण्याचा त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे पॉलाचे प्रायव्हेट पार्टस एक्सपोझ होण्यापासून वाचले. त्यानंतर माकडाने तिला चक्क थप्पड मारली. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर, मंझानलच्या 2.1 दशलक्ष टिकटोक फॉलोअर्सनी मॉडेलबद्दल चिंता व्यक्त केली आहे.