Massive Condom Sale: नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला Swiggy Instamart द्वारे मोठ्या प्रमाणात कंडोमची विक्री; Durex India ने दिली मजेशीर प्रतिक्रिया (See)
स्विगीचे एक ट्वीट चर्चेत होते, ज्यामध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला स्विगी इंस्टामार्टने मोठ्या प्रमाणात कंडोमची डिलिव्हरी केली असल्याचे नमूद केले होते.
नुकतेच देशभरात जल्लोषात नववर्षाच्या स्वागताचा उत्साह साजरा झाला. या काळात स्विगीचे एक ट्वीट चर्चेत होते, ज्यामध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला स्विगी इंस्टामार्टने मोठ्या प्रमाणात कंडोमची डिलिव्हरी केली असल्याचे नमूद केले होते. स्विगीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट करत लिहिले की होते की, ‘आतापर्यंत @DurexIndia कंडोमची 2757 पॅकेट @SwiggyInstamart द्वारे वितरित केली गेली आहेत. कृपया हा आकडा 6969 पर्यंत घेऊन जाण्यासाठी अजून 4212 ऑर्डर करा जेणेकरुन आम्ही सर्वजण ‘नाईस’ म्हणू शकू.’
त्यावर ड्यूरेक्सने अतिशय मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. ड्यूरेक्सने लिहिले की, ‘इतक्या मोठ्या प्रमाणत कंडोम डिलिव्हर केल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला माहित आहे की, हे 2757 चांगल्या प्रमाणात व्यतीत करत आहेत. आम्हाला आशा आहे की ते उद्या सकाळी एकत्र कॉफी ऑर्डर करतील.’ आता ड्यूरेक्सचे हे ट्वीट व्हायरल होत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)