Man Surprises Girlfriend: भारतीय व्यक्तीने अमेरिकेतील न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर गर्लफ्रेंडला दिले मोठे सरप्राईज; पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का (Watch Video)
लेखा असे या मुलीचे नाव असून आकाश नावाचा तिचा प्रियकर आहे. लेखाच्या वाढदिवसानिमित्त ते अमेरिकेत होते. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, लेखा एका मोठ्या होर्डिंगसमोर फोटोसाठी पोज देत आहे.
गर्लफ्रेंडला सरप्राईज देण्याचे विविध प्रकार तुम्ही पाहिले असतील. अनेक बॉयफ्रेंड्स विविध मार्गांनी आपल्या गर्लफ्रेंडला आश्चर्यचकित करण्याचा प्रयत्न करतात. आता असाच एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका देसी भारतीय व्यक्तीने अतिशय अनोख्या पद्धतीने आपल्या गर्लफ्रेंडला मोठे सरप्राईज दिले आहे. या व्यक्तीने अमेरिकेमधील न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर आपल्या गर्लफ्रेंडचा खास व्हिडीओ प्रकाशित करून तिला आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याने न्यूयॉर्कमधील सर्वात व्यस्त ठिकाणी तिचा एक व्हिडिओ प्ले केला.
लेखा असे या मुलीचे नाव असून आकाश नावाचा तिचा प्रियकर आहे. लेखाच्या वाढदिवसानिमित्त ते अमेरिकेत होते. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, लेखा एका मोठ्या होर्डिंगसमोर फोटोसाठी पोज देत आहे आणि अचानक बिलबोर्डवर लेखाच्या चित्रांचा स्लाइड शो सुरू होतो. हा व्हिडीओ पाहून तिला सुखद धक्का बसलो. (हेही वाचा: Delhi Metro Couple Video: दिल्ली मेट्रोमधील कपलचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल; Watch)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)