Man Secretly Lived in Shopping Mall: ऐकावे ते नवलंच! व्यक्तीने शॉपिंग मॉलला बनवले घर; गुपचूप अनेक महिने केले वास्तव्य, झाली अटक
तंबू, एक टेबल, एक संगणक आणि खुर्चीसह तो शॉपिंग मॉलमध्ये राहत होता.
कोरोना नंतर चीनमधील आर्थिक परिस्थिती अनेक अर्थांनी बदललेली आहे. सध्या इथल्या घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. लोकांना भाड्याने घरे परवडेनासे झाले आहेत. अशात एका व्यक्तीने भाड्याच्या खर्चात बचत करण्याचा एक भन्नाट उपाय शोधून काढला आहे. शांघायमध्ये एका विद्यार्थ्याने तब्बल सहा महिने शॉपिंग मॉलमध्ये वास्त्यव्य केले आहे. जेव्हा हा विद्यार्थी कथितरित्या जिन्याच्या खाली सहा महिन्यांपासून राहत आहे, हे समजल्यावर मॉलमधील सुरक्षा रक्षकांना धक्काच बसला. या व्यक्तीने जिन्याखाली स्वतःचे घर थाटले होते. तंबू, एक टेबल, एक संगणक आणि खुर्चीसह तो शॉपिंग मॉलमध्ये राहत होता. जेव्हा एका सुरक्षा रक्षकाने त्याला हटकले तेव्हा त्याने परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी जागा हवी आहे असे सांगितले. हे ऐकून सुरक्षा रक्षकाला त्याची दया आली आणि त्याने त्याला तिथे राहू दिले. मात्र काही दिवसांनी इतर गार्डसनीदेखील त्याला पहिले व प्रशासनाला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. ही व्यक्ती 30 ऑक्टोबरपर्यंत शांघाय मॉलमध्ये पायऱ्यांखाली राहत होता. (हेही वाचा: Dehradun Reliance Jewels Showroom Loot Video: डेहराडूनमध्ये चोरट्यांनी बंदुकीच्या धाकावर लुटले करोडोंचे दागिने, Watch)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)